

बेळगाव - बेळगावात 'कोव्हॅक्सिन'च्या मानवी चाचणीला सुरुवात झाली असून 40 जणांना कोव्हॅक्सिन देण्यात आले आहे. इंडियन कौन्सिल ऑफ इंडियाकडून (आयसीएमआर) राज्यातील एकमेव डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडवरील जीवनरेखा रुग्णालयाची निवड करण्यात आली आहे. त्यानुसार येथे चाचणीला सुरुवात झाली असून सुमारे दीडशे जणांच्या चाचणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 18 ते 60 वयोगटातील 40 जणांची चाचणी सुरु झाली आहे.
कोव्हॅक्सिनच्या मानवी चाचणीसाठी गेल्या आठवड्यात स्वयंसेवकांची निवड करण्यात आली असून त्यांच्या स्वॅबची तपासणी केली आहे. ज्यांना कोरोनाचा संसर्ग झालेला नाही त्यांच्यावर कोव्हॅक्सिनची मानवी चाचणी केली जात आहे. एकदा स्वयंसेवक नॉन कोविड असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर जीवनरेखा रुग्णालयात चाचणीला सुरुवात केली जात आहे, अशी माहिती जीवनरेखा रुग्णालयाचे व्यवस्थापकीय संचालक (मेडिसीन) डॉ. अमित भाते यांनी दिली. हैदराबादमधील भारत बायोटेक कंपनीकडून कोरोनावरील कोव्हॅक्सिन स्वदेशी लस तयार करण्यात आली आहे. आयसीएमआरच्या मार्गदर्शनानुसार या लसीची मानवी चाचणी घेतली जात आहे. लसीचा पहिला डोस दिल्ली येथे 24 जुलै रोजी देण्यात आला.
कोव्हॅक्सिनच्या मानवी चाचणीसाठी देशातील विविध रुग्णालयांची निवड करण्यात आली असून त्यात बेळगावच्या जीवनरेखा रुग्णालयाचा समावेश आहे. डॉ. भाते यांच्या मार्गदर्शनाखाली बेळगावात चाचणी सुरु झाली असून गेल्या आठवड्यापासून 40 जणांवर चाचणी करण्यात आली आहे. स्वयंसेवकाला लस दिल्यानंतर शरीरात तयार होणाऱ्या अँटी बॉडीजचे परीक्षण केले जाणार आहे. त्याबाबतची नियमावली तयार करण्यात आली असून लस घेतलेल्या स्वयंसेवकांना रुग्णालयात दाखल केले जाणार नाही; पण त्यांचे नियमित निरीक्षण केले जाणार आहे. सुमारे दोन ते तीन महिने निरीक्षण करण्यासह स्वयंसेवकाशी संवाद ठेवला जाणार आहे. आवश्यकता भासल्यासच स्वयंसेवकाला रुग्णालयात बोलावून तपासणी त्याची केली जाणार आहे.
बेळगावात कोव्हॅक्सिन मानवी चाचणीला सुरुवात झाली असून 40 जणांवर चाचणी केली आहे. पुढील दोन ते तीन महिने त्यांचे निरीक्षण केले जाणार आहे. यादरम्यान त्यांच्या रोग प्रतिकारशक्ती (अँटी बॉडीज) तयार झाली आहे का, याची चाचपणी केली जाईल. त्याला यश मिळाल्यानंतर तसेच कोरोनाचा संसर्ग होत नसल्याचे निदान झाल्यानंतर लसीचा विस्तार केला जाऊ शकतो.
-डॉ. अमित भाते, व्यवस्थापकीय संचालक (मेडिसीन), जीवनरेखा रुग्णालय
संपादन - मतीन शेख
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.